'गर्लफ्रेंडमुळे Chess साठी...', डी गुकेश काय म्हणाला?

Pranali Kodre

बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४

बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.

D Gukesh | Sakal

डी गुकेश

सुवर्णपदक विजेत्या संघात १८ वर्षीय डी गुकेशचाही समावेश होता. त्यानेही या स्पर्धेत शानदार कामगिरी केली.

D Gukesh | Sakal

ऐतिहासिक विजेतेपद

गुकेशने वयाच्या १७ व्या वर्षीच कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला होता.

D Gukesh | Sakal

विश्वविक्रम

कँडिडेट्सचे विजेतेपद मिळवणारा तो आजवरचा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे.

D Gukesh | Sakal

त्याग

त्याने बुद्धिबळ खेळासाठी बऱ्याच गोष्टींना दूरही केले, त्याने या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शाळाही लवकर सोडली.

D Gukesh | Sakal

रिलेशनशीप नाही

दरम्यान गुकेशला एका मुलाखतीत गर्लफ्रेंड आहे का असं विचारलं होतं, त्यावर त्याने नकार दिला होता.

D Gukesh | Sakal

गर्लफ्रेंड असेल तर..

त्यानंतर गर्लफ्रेंड असेल तर खेळावर परिणाम होईल का? असं विचारल्यावर गुकेश म्हणाला, 'मी कधी हा विचार केला नाही. पण जर गर्लफ्रेंड झाली, तर बुद्धिबळासाठी मी जो वेळ देतो, तो जरा कमी होईल. खेळावर परिणाम होईल, असं काही नाही. पण एखाद्या नात्यासाठी तो वेळ द्यावा लागतो. माझं आत्ता या गोष्टींमध्ये पडण्याचं वयही नाही.'

D Gukesh | Sakal

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

गुकेश आता जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या दिग्गज डिंग लिरेनविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

D Gukesh | Sakal

ENG vs AUS: युवा शिलेदार! हॅरी ब्रुकने मोडला १३ वर्ष जुना विक्रम

Harry Brook | Sakal
येथे क्लिक करा