Pranali Kodre
पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २६ जुलैला रात्री पार पडला.
या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल भारताचे ध्वजधारक होते.
दरम्यान साल २००० पासून झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ध्वजधारकाचा मान कोणाकोणाला मिळालाय हे पाहू.
२००० ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या ध्वजधारकाचा मान लिएंडर पेसला मिळाला होता.
२००४ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या ध्वजधारकाचा मान अंजू बॉबी जॉर्जला मिळाली होती.
२००८ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या ध्वजधारकाचा मान राज्यवर्धन सिंह राठोडला मिळाला होता.
२०१२ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या ध्वजधारकाचा मान सुशील कुमारला मिळाला होता.
२०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या ध्वजधारकाचा मान अभिनव बिंद्राला मिळाला होता.
२०२० ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या ध्वजधारकाचा मान मेरी कॉम, मनप्रीत सिंग यांना मिळाला होता.