Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यासाठी २२ जुलै रोजी मुंबईतून रवाना झाला.
तत्पूर्वी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली.
यावेळी गौतम गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोण कोण असणार याबाबत मोठी घोषणा करण्यात आली.
गौतम गंभीरने त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये अभिषेक नायर आणि रायन टॅन डोइचेट यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड पक्की झाल्याचे सांगितले.
त्याशिवाय साईराज बहुतुले व टी दिलीप हे श्रीलंका दौऱ्यावर सपोर्ट स्टाफ म्हणून येत असल्याची माहितीही गंभीरने दिली.
बहुतुले यांची सध्या फक्त प्रभारी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याची चर्चा आहे.
तसेच राहुल द्रविडच्या सपोर्ट स्टाफमध्ये असलेल्या टी दिलीप यांनी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी कायम केल्याचंही समजत आहे.
दरम्यान अशी चर्चा आहे की श्रीलंका दौऱ्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्केलची नियुक्ती केली जाऊ शकते.