Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिका संघाशी होणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणारा अंतिम सामना बार्बाडोसमधील केन्सिंगटन ओव्हल स्टेडियमवर होईल.
भारतीय संघाची टी२० वर्ल्ड कपमधील अंतिम सामना खेळण्याची ही तिसरी वेळ आहे, तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम सामना खेळणार आहे.
विशेष म्हणजे भारताने आत्तापर्यंत जेव्हाही टी२० वर्ल्ड कप खेळला आहे, त्यावेळी दक्षिण आफ्रिका महत्त्वाचा भाग राहिला आहे.
म्हणजे २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिला टी२० वर्ल्ड कप भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वात जिंकला होता. तेव्हा ती स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाला होता. जोहान्सबर्गला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ धावांनी पराभूत केलेलं.
त्यानंतर २०१४ टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका संघालाच पराभूत करत दुसऱ्यांदा अंतिम सामना गाठला होता.
आता २०२४ टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे.