कार्तिक पुजारी
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिपरी) लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशाची नावे जाहीर केली आहेत.
लष्करी क्षेत्रावर खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा क्रमांक लागतो.
रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये भारताने लष्करावर ८३.६ अब्ज डॉलर खर्च केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा खर्च ४.२ टक्क्यांनी जास्त आहे
चीनने २०२३ मध्ये आपल्या सैन्यावर २९६ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हा खर्च ६ टक्के आहे.
लष्करावर सर्वाधिक खर्च करणारे ५ देश कोणते हे जाणून घेऊया
१. अमेरिका- ९१६ अब्ज डॉलर
२. चीन- २९६ अब्ज डॉलर
३. रशिया- १०९ अब्ज डॉलर
४. भारत - ८४ अब्ज डॉलर
५. सौदी अरेबिया- ७६ अब्ज डॉलर