Pranali Kodre
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी चांगली कामगिरी केली आहे.
भारताच्या नितेश कुमारने पुरुषांच्या एकेरी SL3 प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हे त्याचे पॅरालिम्पिकमधील पहिलेच सुवर्णपदक ठरले.
त्याने अंतिम सामन्यात टोकियो पॅरालिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेल याच्यावर २१-१४, १८-२१, २३-२१ असा तीन सेटमध्ये रोमहर्षक विजय साकारला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
नितेशकुमार याच्यावर २००९ मध्ये वयाच्या १५व्या वर्षी विशाखापट्टनम येथे झालेल्या रेल्वे अपघातात पाय गमावण्याची आपत्ती कोसळली. वडिलांप्रमाणे नेव्ही अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने बघितले होते, पण रेल्वे अपघातामुळे तो निराश झाला.
पण यानंतरही नितेशने त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि त्याने २०१३ मध्ये आयआयटी मंदी येथे प्रवेश मिळवला.
तिथे शिक्षण घेत असतानाच त्याच्यामध्ये बॅडमिंटनबद्दल रस निर्माण झाला.
त्यानंतर त्याने बॅडमिंटनमध्ये आपले करियर घडवत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले.