Pranali Kodre
२९ जून २०२४... भारतीय क्रिकेट इतिहासात कायमस्वरुपी ही तारीख लक्षात ठेवली जाईल.
याच दिवशी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या. त्यामुळ भारताने ७ धावांनी विजय मिळवला.
या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार सेलीब्रेशन केले.
काही खेळाडू नाचले, तर उपकर्णधार हार्दिक पांड्यानेही त्याचं अनोखं सेलिब्रेशन केलं.
या विजेतेपदानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
भारतीय खेळाडूंनी एकमेकांना आनंदाने मिठी मारत आनंदाश्रु डोळ्यातून वाहू दिले.
दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाने केलेल्या जल्लोषाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.