Swadesh Ghanekar
भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी प्रचंड मेहनत घेत आहे.
१९ सप्टेंबरपासून चेन्नईत पहिली कसोटी सुरू होणार आहे आणि यात युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल याला मोठा पराक्रम करण्याची संधी आहे.
यशस्वीने १३२ धावा करताच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC ) या सर्कलमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद होईल.
कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी सलामीला येणे अपेक्षित आहे.
२२ वर्षीय यशस्वीने १३२ धावा केल्यास, तो भारताकडून WTC च्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.
अजिंक्य रहाणेच्या नावावर विक्रम आहे. त्याने २०१९-२१च्या WTC मध्ये ११५९ धावा केल्या होत्या.
यशस्वी हा WTC च्या एका हंगामात १००० धावा करणारा अजिंक्य व रोहितनंतर तिसरा भारतीय फलंदाज आहे.
WTC 2023-25 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वी इंग्लंडच्या बेन डकेटसह ( १०२८) संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
यशस्वी जैस्वालला सर्वाधिक धावा करणाऱ्या जो रूटला ( १३९८) मागे टाकण्यासाठी ३७१ धावांची गरज आहे.