T20 World Cup: भारत वि. पाकिस्तान सामन्यांचा 'असा' आहे इतिहास

Pranali Kodre

टी20 वर्ल्ड कप 2024

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या फेरीत भारत आणि पाकिस्तान संघात 9 जून रोजी न्युयॉर्कला सामना होणार आहे.

India vs Pakistan | Sakal

भारत आणि पाकिस्तान

टी20 वर्ल्डकपच्या इतिहासातील हा भारत आणि पाकिस्तान संघात होणारा आठवा सामना आहे.

India vs Pakistan | X/ICC

पहिला वर्ल्ड कप

भारत आणि पाकिस्तान 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये दोनवेळा आमने-सामने आले होते.

India vs Pakistan | X/ICC

टी20 वर्ल्ड कप 2007

टी20 वर्ल्ड कप 2007 मध्ये साखळी फेरीत भारताने बरोबरीनंतर बॉलआऊटमध्ये पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यानंतर अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत केले होते.

India 2007 | X/ICC

टी20 वर्ल्ड कप 2012

यानंतर 2012 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये कोलंबोला झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत केले होते.

Virat Kohli | X/ICC

टी20 वर्ल्ड कप 2014

टी20 वर्ल्ड कप 2014 मध्ये ढाका येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केले होते.

India vs Pakistan | X/ICC

टी20 वर्ल्ड कप 2016

यानंतर साल 2016 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताने कोलकाताला झालेल्या सामन्यात पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केले होते.

India vs Pakistan | X/ICC

टी20 वर्ल्ड कप 2021

टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये दुबईला झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सनने पराभूत केले होते.

India vs Pakistan | X/ICC

टी20 वर्ल्ड कप 2022

टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये मेलबर्न येथे भारतीय संघाने पाकिस्तानला 4 विकेट्सने पराभूत केले होते.

India vs Pakistan | X/ICC

सुनील छेत्रीचा पाणावलेल्या डोळ्यांनी फुटबॉलला अलविदा

Sunil Chhetri | X/IndianFootball
येथे क्लिक करा