सकाळ डिजिटल टीम
कोणत्याही देशासाठी, त्यांचे खरे हिरो सैनिक (Indian Army) असतात, जे संपूर्ण देशाचं रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. भारतीय जवानांनीही अनेक प्रसंगी जीवाची पर्वा न करता शत्रूंशी लढून आपल्याला विजय मिळवून दिला आहे.
अशी एक तारीख भारतीय इतिहासात अजरामर झाली आहे. ती तारीख 26 जुलै 1999 आहे. 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुमारे 60 दिवस चालले होते, जे 26 जुलै रोजी भारताच्या विजयाने संपले.
भारताच्या या विजयामागे अनेक सैनिकांचे बलिदान दडले आहे, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारताचा गौरव केला. या विजय गाथेवर अनेक चित्रपटही बनवले गेले आहेत.
कारगिल युद्धावर बनलेला हा नवीन चित्रपट आहे. 12 ऑगस्ट 2021 रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कारगिल युद्धाच्या नायकांपैकी एक असलेल्या कॅप्टन विक्रम बत्राची कथा दाखवण्यात आली होती. विक्रम बत्रा यांना मरणोत्तर सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. शेरशाह चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसले होते.
2020 साली प्रदर्शित झालेला 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' हा चित्रपट देखील याच युद्धावर आधारित चित्रपट आहे. कारगिल युद्धात देशाचे रक्षण करणारे भारतीय हवाई दलाचे पायलट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरने गुंजन सक्सेनाची भूमिका साकारली होती.
2004 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट कारगिल युद्धाच्या ऐतिहासिक घटनांवर आधारित काल्पनिक कथा आहे. चित्रपटात हृतिक रोशनने लेफ्टनंट करण शेरीगलची भूमिका साकारलीये. जो दहशतवाद्यांचा पराभव करण्यासाठी आपल्या टीमचं नेतृत्व करतो. हा चित्रपट फरहान अख्तरने दिग्दर्शित केला होता.
'L.O.C. कारगिल' 2003 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट कारगिल युद्धावर आधारित असून, पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवण्यासाठी भारतीय जवानांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट भारतीय लष्कराच्या यशस्वी ऑपरेशन विजयवर आधारित आहे. या चित्रपटात संजय दत्त, अजय देवगण, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, मनोज बाजपेयी आदी कलाकार दिसलेत.