Pranali Kodre
भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात १९ जून रोजी वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला.
बंगळुरूला झालेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने ४ धावांनी रोमांचक विजय मिळवला.
दरम्यान, हा सामना महिला क्रिकेटमधील ऐतिहासिक सामना ठरला.
या सामन्यात तब्बल चार फलंदाजांनी शतके केली. भारताकडून स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर, तर दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्ड आणि मॅरिझेन कॅप यांनी शतके केली.
त्यामुळे महिला वनडेमध्ये असं पहिल्यांदाच झाले की चार फलंदाजांनी एकाच वनडेत शतके केली.
स्मृती मानधानाने १२० चेंडूत १३६ धावांची खेळी केली. या खेळीत तिने १८ चौकार आणि २ षटकार मारले.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने ८८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली.
लॉरा वोल्वार्डने १३५ धावांची खेळी केली. या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकार मारले.
मॅरिझेन कॅपने ९४ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ११४ धावांची खेळी केली.