Rajput Warriors : भारतातले शूर राजपुत राजे, शक्ती अन् युक्तीने लावली शत्रूंची वाट

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी ते महाराणा प्रताप, शत्रूंची वाट लावणारे भारतातले शूर वीर योद्धा

Rajput warriors

१. महाराणा प्रताप

महाराणा प्रताप हे मेवाडचे राजा होते. ते इतिहासातील एकमेव राजा होते जे मुघलांपुढे कधीच झुकले नाहीत. असे म्हटले जाते की महाराणा प्रतापांसोबत झालेल्या युद्धानंतर मुघल त्यांच्या नावानेच घाबरायचे.

Rajput warriors

२. पृथ्वी राज चौहान

पृथ्वीराज चौहान अजमेर आणि दिल्लीचे राजा होते. त्यांनी मोहम्मद गौरीला १७ वेळा युद्धात हरवलं. ऐतिहासकारांच्या मते त्यांच्याजवळ ३००० हत्ती आणि ३ लाख सैनिक होते.

Rajput warriors

३. महाराणा सांगा

राणा सांगा यांनी मेवाडवर १५०९ ते १५२८ पर्यंत राज्य केलं. बाबरसह आक्रमणावेळी राजा सांगा सगळ्यात शक्तीशाली शासक होते. इतिहासात त्यांना महाराणा संग्राम सिंह प्रथम या नावाने ओळखले जाते.

Rajput warriors

४. महाराणा कुंभा

महाराणा कुंभा हे मेवाडचे राजा होते. त्यांना मेवाडवर १४३३ ते १४६८ पर्यंत राज्य केलं. त्यांनी चित्ताडगढ. कुंभलगढ, अचलगढ, विजयस्तंभ सारख्या शेकडो किल्ल्यांवर मंदिरं बांधली.

Rajput warriors

५. मिहीर भोज

मिहीर भोज हे भारतातील प्रतापी राजा होते. त्यांचं साम्राज्य मुल्तान ते बंगालपर्यंत होते. मिहीर राजा भगवान विष्णूचे मोठे भक्त होते.

Rajput warriors

६. बप्पा रावल

मेवाड राजघराण्याचा आदिपुरुष बप्पा रावल यांचा जन्म ७१३-१४ मध्ये झाला होता. बप्पा रावलला कालभोजच्या नावानेही ओळखल्या जातं. बप्पा रावलने २० वर्षांच्या वयात मोरीला पराभूत करत चितोडवर राज्य केलं होतं.

Rajput warriors

७. महाराणा विक्रमादित्य

उज्जैनचे सम्राट विक्रमादित्य एक चक्रवर्ती सम्राट होते. विक्रमादित्यबाबत प्राचीन अरब साहित्यात वर्णन आहे. त्यांचं राज्य अबरपर्यंत पसरलेलं होतं. त्यांनीच नवरत्नांच्या परंपरेला सुरुवात केली होती.

Rajput warriors

८. विद्याधर चंदेल

विद्याधर चंदेल मध्यभारतातील सगळ्यात बलवान आणि महान हिंदू राजपुत सम्राट होते. त्यांनी महमूद गजनवीला पराभूत केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajput warriors