पाकिस्तानात 'या' बॉलिवुड चित्रपटांवर बंदी

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवुड चित्रपटात पाकिस्तानला नेहमी शत्रू देश समजून चित्रपटाची कथा दाखवली जाते. त्यामुळे सध्या पाकमध्ये काही चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

banned | sakal

गदर

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर' या चित्रपटात पाकिस्तानात घुसून पाकिस्तानी लोकांना रडवणाऱ्या तारा सिंहची वृत्ती पाहून पाकिस्तान सरकारने या चित्रपटावर बंदी घातली.

gadar | sakal

लक्ष्य

हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांचा 'लक्ष्य' हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट युद्ध चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाची कथा 'कारगिल वॉर'वर आधारित आहे. या युद्धात पाकिस्तानचा झालेला पराभव दाखविलेला आहे.

lakshya | sakal

भाग मिल्खा भाग

भारतातील एक महान अ‍ॅथलेटिक्स मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपटात आहे. 'मुझसे नहीं होगा, मैं पाकिस्तान नहीं जाऊंगा' या डायलॉगमुळे पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.

bhaag milkha bhaag | sakal

रांझणा

धनुष आणि सोनम कपूर यांचा रोमँटिक-ड्रामा असलेल्या रांझणा या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आल्याचे कारण थोडं आश्‍चर्यचकित आहे, सोनमच्या ग्लॅमरस भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.

ranzana | sakal

बेबी

अक्षय कुमारचा बेबी हा चित्रपटाची कथा दहशतवाद आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद यांच्यावर आहे. इस्लामाबाद आणि कराची सेन्सॉर बोर्डाने मुस्लिमांना दहशतवादी दाखवल्याने, या चित्रपटावर बंदी घातली गेली.

baby | sakal

फैंटम

सैफ अली खान आणि कतरिना कैफ याचा फैंटम या चित्रपटात मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याची कथा दाखवण्यात आली आहे. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना मारला असल्याच यात दाखवल्याने या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.

phantom | sakal

पॅडमॅन

पॅडमॅन हा चित्रपट अक्षय कुमार आणि राधिका आपटे याचा मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड या विषयावर आधारित आहे. पाकिस्तान सरकारने या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.

padman | sakal

नीरजा

सोनम कपूरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट 'नीरजा' या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. सप्टेंबर 1986 रोजी, लिबियन-समर्थित अबू निदाल संघटनेने कराची, पाकिस्तान येथे पॅन अॅम फ्लाइट 73 चे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

neerja | sakal

राझी

आलिया भट्ट आणि विकी कौशलचा राझी या थ्रिलर चित्रपटात एका भारतीय रॉ एजंटची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. आलिया भट्ट देशाच्या फायद्यासाठी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करते.

raazi | sakal

मुल्क

अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'मुल्क' हा एक उत्तम चित्रपट आहे. ऋषी कपूर आणि तापसी पन्नूने यात उत्तम अभिनय केला आहे. चित्रपटात मुस्लिमांना दहशतवादी म्हणून दाखवलं गेलं आहे आणि यामुळेच पाकिस्तानने या चित्रपटावर बंदी घातली.

mulk | sakal

हैदर

हैदर या चित्रपटात शाहिद कपूर आणि तब्बू हे काश्मीरी दहशतवादी असून काश्मिरी लोकांचे भारतावरील प्रेम या चित्रपटात दाखविले आहे.म्हणून या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घातली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

haider | sakal