Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवला जाणार आहे.
टी20 वर्ल्ड कपचे हे नववे पर्व आहे.
आत्तापर्यंत झालेल्या 8 टी20 वर्ल्ड कपमध्ये मिळून भारतीय संघाचे 3 खेळाडूंनी नेतृत्व केले आहे. हे तीन खेळाडू कोण आहेत जाणून घेऊ.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 2007, 2009, 2010, 2012, 2014 आणि 2016 अशा सहा टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तो टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाराही कर्णधार आहे.
धोनीच्या नेतृत्वात भारताने 33 सामने खेळले असून 21 सामने जिंकले आहेत, तर 11 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही. त्याच्याच नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकपही जिंकला.
साल 2021 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली 5 सामन्यांत खेळताना भारताने 3 सामने जिंकले, तर 2 सामने पराभूत झाले.
रोहित शर्माने 2022 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात भारताने 6 सामने खेळले, ज्यात 4 विजय मिळवले, तर 2 पराभव स्विकारले.
रोहित आता टी20 वर्ल्ड कप 2024 मध्येही भारताचे नेतृत्व करणार आहे.