Pranali Kodre
लंडनमध्ये सध्या विम्बल्डन २०२४ स्पर्धा सुरू आहे.
जंटलमनची स्पर्धा म्हणूनही विम्बल्डन ओळखले जाते.
त्यामुळे या स्पर्धेसाठी प्रेक्षकही अगदी फॉर्मल कपडे घालून सामने पाहायला येतात. अनेक सेलिब्रेटीही अगदी फॉर्मल कपड्यांमध्ये ही स्पर्धा पाहायला येतात.
भारताचा टी२० वर्ल्डकप २०२४ विजेता कर्णधार रोहित शर्माही १२ जुलैला विम्बल्डनमधील सामने पाहाण्यासाठी लंडनला गेला होता.
रोहितने विम्बल्डनसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचे ब्लेझर आणि पँट असा पेहराव केला आहे.
त्याचा हा अगदीच सुटा-बुटातील लूक चर्चेचा विषय ठरत आहे.
रोहितसह त्याचा मेव्हणा कुणाल सजदेह देखील आहे.
यापूर्वीही अनेक क्रिकेटपटूंनी विम्बल्डन पाहण्यासाठी लंडनला हजेरी लावली होती.