Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारताला ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने ६ आणि ७ जुलै रोजी खेळवण्यात आले होते.
यानंतर तिसऱ्या सामन्यापूर्वी दोन दिवस विश्रांती असल्याने या दरम्यान भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये जंगल सफारीवर गेला होता.
बीसीसीआयने झिम्बाब्वे क्रिकेट आणि झिम्बाब्वे टूरिझमच्या सहाय्याने ही सफारी आयोजित केली होती.
या सफारीमध्ये खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि त्यांच्या कुटुंबाला जंगली वातावरणाचा आनंद घेता आला. याचे फोटोही बीसीसीआयने शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये शुभमन गिल, ऋतुराज गायतवाड, तुषार देशपांडे, रवी बिश्नोई, रिंकु सिंग असे अनेक खेळाडू जंगल सफारीचा आनंद घेताना दिसत आहेत.
यावेळी भारतीय संघांना हत्ता, जिराफ असे प्राणीही जवळून पाहाण्याची संधी मिळाली.
भारतीय संघासह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षकांची फळी आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण प्रभारी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.