Swadesh Ghanekar
गंभीरचे प्रशिक्षक झाल्यानंतर त्याच्या शिष्यानेही आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. गंभीरला मेंटॉर मानणाऱ्या चेतन साकारियाने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.
२०२४ च्या मोसमासाठी गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक बनला. लिलावादरम्यान त्याने वेगवान गोलंदाज चेतन साकारियाला ५० लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. KKRच्या शिबिरात त्याला गंभीरडून खूप काही शिकायला मिळाले.
चेतनला टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही. त्याने वैयक्तिक आयुष्यात नवीन इनिंग सुरू केली आहे. त्याने १४ जुलै रोजी मेघना जंबूचाशी लग्न केले. दोघांची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये साखरपुडा केला होता. या लग्नाला चेतनचे जवळचे मित्र उपस्थित होते.
लग्नानंतर १० दिवसांनी चेतनने त्याच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील या नव्या इनिंगबद्दल सोशल मीडियावरून सांगितले. त्याने लिहिले, 'मी तुझा आणि तू माझी झालीस.'
चेतनच्या या पोस्टवर राजस्थान रॉयल्स संघाने एक मजेदार कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले, 'काय चेतन भाई, तुम्ही फोनही केला नाही.' चेतन पहिल्यांदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.
चेतनच्या लग्नाच्या फोटोत जयदेव उनाडकट दिसत आहे आणि त्याने चेतनला आयुष्याच्या नव्या स्पेलसाठी शुभेच्छा दिल्या.
चेतन साकारियाने भारतीय संघाकडून २ ट्वेंटी-२० व १ वन डे सामना खेळला आहे. त्याने वन डेत २ आणि ट्वेंटी-२० त एक विकेट घेतली आहे.
गुजराजतच्या भावनगर जिल्ह्यापासून १५ किमी दूर असलेल्या वार्तेज गावातला चेतनचा जन्म... त्याला सुरुवातीच्या काळात खेळण्यासाठी शूजही नव्हते. शेल्डन जॅक्सनने त्याला ते दिले. चेतनच्या भावाने २०२१ मध्ये आत्महत्या केली आणि कोरोना काळात त्याच्या वडिलांचे निधन झाले.