Ravi Shastri: व्यक्ती एक, भूमिका अनेक

Pranali Kodre

वाढदिवस

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा जन्म 27 मे 1962 साली मुंबईत झाला.

Ravi Shastri | X/BCCI

अष्टपैलू खेळाडू

अष्टपैलू खेळाडू असलेले शास्त्री यांच्या कारकि‍र्दीची सुरुवात एक गोलंदाज म्हणून झाली होती. पण नंतर त्यांनी फलंदाजीतही आपले कौशल्य दाखवले.

Ravi Shastri | X/BCCI

आंतरराष्ट्रीय क्रिकेट

त्यांनी भारताकडून 80 कसोटीत 11 शतकांसह 3830 धावा केल्या आणि 151 विकेट्स घेतल्या. तसेच 150 वनडेत 3108 धावा केल्या आणि 129 विकेट्स घेतल्या आहेत.

Ravi Shastri | Sakal

वर्ल्ड कप विजेता

शास्त्री 1983 सालच्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचाही भाग होते.

Ravi Shastri | X/ICC

मुंबईसाठी मोलाचं योगदान

त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठीही खेळाडू आणि कर्णधार म्हणून मोलाचा वाटा उचलला. त्यांनी मुंबईकडून रणजी ट्रॉफी 1985-86 मध्ये 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते.

Ravi Shastri | X/ICC

समालोचक

खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर त्यांनी समालोचन क्षेत्रात पाऊल टाकले. ते अजूनही समालोचन करताना दिसतात. त्यांच्या समालोचनाचेही अनेक चाहते आहेत.

Ravi Shastri

संचालक

इतकेच नाही, तर शास्त्री 2014 ते 2016 दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे संचालकही होते.

Ravi Shastri | X/BCCI

प्रशिक्षक

तसेच शास्त्री यांनी 2017 ते 2021 दरम्यान भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षकपदही सांभाळले.

Ravi Shastri | X/ICC

आयपीएल ट्रॉफी जिंकणारे सर्व विजेत अन् उपविजेते संघ

KKR | X/KKRiders
येथे क्लिक करा