'टेनिसवर आता एकच राज...' सचिन तेंडुलकरकडून २१ वर्षांच्या अल्काराजचे कौतुक

Pranali Kodre

विम्बल्डन २०२४

विम्बल्डन २०२४ स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद २१ वर्षीय कार्लोस अल्काराजने मिळवले.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

जोकोविच पराभूत

त्याने अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविचला ६-२, ६-२, ७-६ (७-४) अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

चौथे ग्रँडस्लॅम

स्पेनच्या अल्काराजचे हे दुसरे विम्बल्डन, तर एकूण चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

विम्बल्डन विजेतेपद

महत्त्वाचे म्हणजे अल्काराजने दोन्ही विम्बल्डन विजेतीपदं अंतिम सामन्यात जोकोविचला पराभूत करत जिंकले आहे.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/atptour

सचिनकडून कौतुक

अल्काराजच्या या विजयानंतर भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले आहे.

Sachin Tendulkar - Ben Stokes | Sakal

टेनिसमध्ये एकच राज

सचिनने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले, 'आतापासून टेनिसवर एकच राज करेल, तो म्हणजे अल्काराज.'

Sachin Tendulkar | Carlos Alcaraz.jpg | Sakal

...तो काही जोक नाही

सचिनने पुढे लिहिले, 'जागतिक दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सरळ सेटमध्ये मात करत विम्बल्डन फायनल जिंकणे हा काही जोक नाही. त्याच्याकडे असलेला वेग, ताकद, ऊर्जा आणि प्लेसमेंट, याचा फायदा अल्काराजला येणाऱ्या वर्षांमध्ये होणार आहे.'

Carlos Alcaraz | Wimbledon | X/atptour

जोकोविचलाही सलाम

सचिनने जोकोविचचे देखील कौतुक केले. त्याने म्हटले, 'नोव्हाक जोकोविचलाही सलाम, तो विजय आणि पराजय यामध्ये स्वत:चा समतोल राखतो. एका चांगल्या खेळाडूचे हे लक्षण आहे.'

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

ग्रँडस्लॅम

अल्काराजने यापूर्वी अमेरिका ओपन २०२२ आणि फ्रेंच ओपन २०२४ या ग्रँडस्लॅम स्पर्धांचेही विजेतेपद जिंकले आहे.

Carlos Alcaraz | Wimbledon | X/Wimbledon

परी म्हणू की सुंदरा! सचिनच्या लेकीचा ग्लॅमरस लूक

Sara Tendulkar | Instagram
येथे क्लिक करा