Pranali Kodre
पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ क्रीडा स्पर्धा २६ जुलैपासून सुरू होणार आहे.
त्यामुळे आता पुढील काही दिवस विविध खेळ पाहाण्याची संधी क्रीडा चाहत्यांना मिळेल. तसेच जगभरातील खेळाडू मेडल मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसतील.
दरम्यान, अनेकांना असे प्रश्न पडले असतील की मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना किती रुपये मिळतात.
तर ऑलिम्पिक समितीकडून पदक विजेत्यांनां रोख बक्षीस दिले जात नाही, मात्र त्या खेळाडूंच्या देशाच्या सरकारकडून आणि राष्ट्रीय क्रीडा मंडळाकडून त्यांना रोख बक्षीस दिले जाऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय सरकारने देखील जर भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले, तर त्याला ७५ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
याशिवाय भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून सुवर्णपदक विजेत्या भारतीय खेळाडूला १० लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
तसेच रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांनाही भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून रोख बक्षीस मिळण्याची शक्यता आहे.