भारतातील ५ हिंदू राजे, ज्यांचा जगभरात वाजतो डंका

Manoj Bhalerao

भारताला वीरांची भूमी म्हटलं जातं. या मातीत असे अनेक वीर जन्माला आले आहेत, ज्यांनी आपल्या शौर्याने इतिहास घडवला आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा ५ हिंदु राजांविषयी सांगणार आहोत.ज्यांच्या शौर्याच्या कथा आजही सांगितल्या जातात

महाराणा प्रताप

आपण शाळेत असल्यापासून महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे धडे आपल्याला देण्यात आले. मुघलांनी त्यांच्यावर अनेक वेळा आक्रमणे केली. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच पडली.

पृथ्वीराज चौहान

चौहान घराण्यातील सर्वात लोकप्रिय राजा पृथ्वीराज चौहान होते. त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी राजा भीमदेव यांना युद्धात पराभवाची धूळ चारली होती. असं सांगितलं जातं की त्यांनी मोहम्मद घोरीला १७ वेळा युद्धात हरवलं होतं.

सम्राट अशोक

भारताच्या सम्राट अशोक यांच्या वीरतेच्या कथा जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचं साम्राज्य उत्तरेतील हिंदकुशपासून बांग्लादेश आणि इराणपर्यंत पसरलेलं होतं.

पोरस

भारताच्या महान राजांमध्ये पोरसचं देखील नाव घेतलं जातं. पोरसच्या शौर्याच्या गोष्टी ऐकून सिकंदरलाही घाम फुटला होता.

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जितकं सांगावं तितकं कमीच आहे. मुघलांच्या बलाढ्य साम्राज्याला सुरुंग लावण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांच्या नाकी नऊ आणले.