सकाळ डिजिटल टीम
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आज देशभर साजरा केला जात आहे.
आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही तितक्याच देश भक्तीने हा उत्सव साजरा केला जात आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिरवा, पांढरा आणि केशरी या तीन रंगाच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केलीये. यासाठी झेंडू, तुळस आणि गुलछडी या पाना-फुलांचा वापर करण्यात आला आहे.
तिरंग्याची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठलभक्ती बरोबर देशभक्तीचा माहोल तयार झाला आहे.
देवाचे प्रवेशद्वार, चौखांबी, सोळखांबीसह मंदिरात फुलांची सजावट केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठलाला आज खास तिरंग्याचा पोषाख देखील परिधान करण्यात आला आहे.
हिरव्या रंगाचे धोतर आणि केशरी रंगाचा अंगरखा आणि गळ्यात पांढरे उपरणे असा तिरंगी पोषाख केला आहे. (फोटो : भारत नागणे)