Pranali Kodre
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताला कुस्तीत ब्राँझपदक जिंकून देणारा अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत मोठी झेप घेतलीये.
जागतिक कुस्ती संघटनेने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत अमन सेहरावत ५७ किलो गटात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपद जिंकून अमनने २००८ पासून ऑलिंपिकमध्ये कुस्तीत पदके मिळवण्याची भारताची परंपरा कायम ठेवली.
ब्राँझपदकासाठी झालेल्या लढतीत त्याने प्युर्तो रिका देशाच्या डॅरियन तोई क्रुझ याचा १३-५ असा पराभव केला होता.
या ऑलिंपिकमध्ये कुस्तीत पदक मिळवणारा तो भारताचा एकमेव कुस्तीपटू ठरला.
जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवताना अमनचे ५१,६०० गुण झाले. तर अव्वल स्थानी असलेल्या जपानच्या रेई हिकुन्ची याच्या नावावर ५९,००० गुण आहेत.
पॅरिसला जाण्यापूर्वी अमन जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर होता. पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.