या देशात भारतीय रुपया आहे दमदार, स्वस्तात करू शकता प्रवास

सकाळ डिजिटल टीम

व्हिएतनाम हा देश नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. भारत आणि व्हिएतनाममधील द्विपक्षीय संबंधही चांगले आहेत. डोंग हे व्हिएतनामचे राष्ट्रीय चलन आहे. भारताचा एक रुपया हा 314.42 डोंगच्या बरोबरीचा आहे

हिंद आणि प्रशांत महासागरामधील प्रदेशात असलेला इंडोनेशिया देशही पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. भारताचा एक रुपया हा इंडोनेशियाच्या 194.40 IDR च्या बरोबरीचा आहे.

कंबोडियातील 55.86 रियाल हे भारतातील एका रुपयाच्या बरोबरीचे आहेत. त्यामुळे याठिकाणी तुम्ही कमी पैशात पर्यटन करु शकता. कंबोडियातील प्राचीन हिंदू आणि बौद्ध मंदिरे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात.

पॅराग्वेचे राष्ट्रीय चलन असलेल्या ग्वारानीची किंमतही भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. एका भारतीय रुपयाच्या मोबदल्यात 91.72 ग्वारानी मोजावे लागतात. हा देश नैसर्गिक सौदर्यांने नटलेला आहे.

कोस्टा रिकातील पर्यटनही भारतीयांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. एका भारतीय रुपयासाठी 8.48 कोस्टारिकन कोलोन मोजावे लागतात. हा देश पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.

मंगोलियात भारताचा एक रुपया 39.10 मंगोलियन तुगरिकच्या बरोबरीचा आहे. हंगेरीचे 3.89 फॉरेंट हंगरी भारतीय रुपयाच्या बरोबरीचे आहेत.

श्रीलंकन आणि भारतीय रुपयाच्या विनिमय दरात 2.72 रुपयांची तफावत आहे. भारतीय रुपयाची किंमत श्रीलंकन चलनाच्या तुलनेत जास्त आहे.

वन्यजीव पाहण्याची आवड असलेले लोक झिम्बाम्वेत जाऊ शकतात. 4.95 झिम्बाम्ब्वे डॉलर्स एक रुपयाच्या बरोबरीचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.