Pranali Kodre
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकरने ३ दिवसात दोन पदके जिंकत इतिहास रचला आहे.
मनू भाकरने आधी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले.
त्यानंतर तिने मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सरबज्योत सिंगसह कांस्य पदक जिंकले.
त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.
याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती तिसरी भारतीय आहे. यापूर्वी सुशील कुमार व पीव्ही सिंधू यांनी दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले आहेत.
पीव्ही सिंधूनंतर दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती दुसरीच भारतीय महिला खेळाडू ठरली. तसेच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन मेडल जिंकणारी पहिलीय भारतीय महिला खेळाडू ठरली.
महत्त्वाचे म्हणजे तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी पदक जिंकण्याची संधी आहे. ती २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारातही सामील होणार आहे.