Dinesh Karthik: भारतीय क्रिकेटमधील 'फिनिक्स'

Pranali Kodre

दिनेश कार्तिक

भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा जन्म 1 जून 1985 रोजी चेन्नईत झाला.

Dinesh Karthik | Sakal

पदार्पण

त्याला 19 व्या वर्षीच भारतीय संघात 2004 साली पदार्पणाची संधी मिळाली. त्याने 2004 मध्ये मायकल वॉनला यष्टीचीत केले होते. ही त्याची यष्टीरक्षक म्हणून पहिली विकेट होती.

Dinesh Karthik | X/ICC

सामनावीर

कार्तिक 2006 साली भारताने खेळलेल्या पहिल्या - वहिल्या टी20 सामन्याचाही भाग होता. विशेष म्हणजे तो त्या सामन्यातील सामनावीरही होता.

Dinesh Karthik | X/ICC

तिन्ही क्रिकेटप्रकारात पदार्पण

कार्तिकने 2004-2006 दरम्यान भारताकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण केले, मात्र त्याला संघातील जागा पक्की करता आली नाही.

Dinesh Karthik | X/ICC

सातत्याने पुनरागमन

त्यातच एमएस धोनीच्या आगमनानंतर तो भारतासाठी पर्यायी यष्टीरक्षक ठरला, त्यामुळे तो संघाच्या आत-बाहेर राहिला. पण असे असतानाही तो सातत्याने संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला.

Dinesh Karthik | X/BCCI

आयसीसी स्पर्धा

तो 2007 टी20 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा भागही होता. कार्तिक 2019 वनडे वर्ल्ड कप आणि 2021 टी20 वर्ल्ड कपही खेळला.

Dinesh Karthik | Sakal

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

त्याने 26 कसोटीत 1025 धावा केल्या, 94 वनडेत 1752 धावा केल्या, तर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 60 सामन्यांत 686 धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून 180 सामन्यांत 126 विकेट्स घेतल्या.

Dinesh Karthik | X/ICC

आयपीएल कारकिर्द

कार्तिकने आयपीएल 2024 नंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कार्तिकने आयपीएलमध्ये 257 सामन्यांत 4842 धावा केल्या. त्याने यष्टीरक्षक म्हणून 174 विकेट्स घेतल्या.

Dinesh Karthik | Sakal

दोन देशांकडून T20 World Cup खेळणारे क्रिकेटर

Corey Anderson | X/ICC
येथे क्लिक करा