Pranali Kodre
महिला क्रिकेटसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश या लीग स्पर्धेत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर अनसोल्ड राहिली.
यंदाच्या मोसमासाठी तिला कोणीच आपल्या संघात घेतले नाही.
२०२१ मधील या बिग बॅश स्पर्धेत हरमनप्रीत सर्वोत्तम खेळाडू ठरली होती. त्या वेळी तिने गोलंदाजीतही चमक दाखवली होती. गतवर्षी हरमनप्रीतने ३२१ धावा केल्या होत्या.
हरमनसाठी कोणी उत्सुकता दाखवली नसली तर स्मृती मानधनासह सहा भारतीय खेळाडूंना प्राधान्य मिळाले आहे. यात दयालन हेमलता, यस्तिका भाटिया, शिखा पांडे, दिप्ती शर्मा, जेमिमाह रोड्रिग्स आणि स्मृती मानधना
यंदाच्या स्पर्धेसाठी लिलावाकरिता झालेल्या ट्राफ्टमध्ये १९ भारतीय खेळाडूंचा समावेश होता.
गतवर्षी या लीगमध्ये खेळलेली हरमनप्रीत एकमेव भारतीय खेळाडू होती.
भारतातील वूमन्स प्रीमियर लीगमध्ये हरमनप्रीत मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार आहे.