Video: कोपरा दुखावला, रडू कोसळलं तरीही भारताची निशा शेवटपर्यंत लढली

Pranali Kodre

निशा दहिया

कुस्तीमध्ये महिलांच्या ६८ किलो वजनी गटात भारताची निशा दहीया सहभागी झाली होती.

Nisha Dahiya | Paris Olympic 2024 | Sakal

उपउपांत्यपूर्व फेरीत विजय

निशाने उपउपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या टेटियाना सोव्हा हिचा ६-४ अशा फरकाने पराभव केला होता.

Nisha Dahiya | Paris Olympic 2024 | Sakal

उपांत्यपूर्व फेरीतही होती आघाडीवर

त्यानंतर ती उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या पाक सोल गमविरुद्ध खेळत होती. ती ८-२ अशी आघाडीवरही होती.

Nisha Dahiya | Paris Olympic 2024 | Sakal

दुखापत झाली अन्...

पण हा सामना सुरू असतानाच निशा दुखापतग्रस्त झाली.तिचं कोपर निखळलं. त्यामुळे तिला रडूही आवरता आलं नाही. पण असं असलं तरी तिनं मैदान सोडलं नाही.

Nisha Dahiya | Paris Olympic 2024 | Sakal

शेवटपर्यंत लढली

फिजिओने तिला तपासल्यानंतरही तिने शेवटचे ३३ सेकंद बाकी असताना तसचं खेळण्याचा निर्णय घेतला. तिने शेवटपर्यंत झुंज दिली.

Nisha Dahiya | Paris Olympic 2024 | Sakal

पण हाती पराभव...

मात्र तिला दुखापतीमुळे प्रतिकार करणं कठीण गेलं आणि नंतर तिला तिला ८-१० अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

Nisha Dahiya | Paris Olympic 2024 | Sakal

व्हिडिओ

दरम्यान दुखापत झाल्यानंतर तिला रडू आवरत नव्हते, त्या घटनेचे व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

जम्पिंग जॅक! PR Sreejesh चे भन्नाट सेलीब्रेशन पाहिलं का?

PR Sreejesh | Indian Hockey Team | Sakal
येथे क्लिक करा