Pranali Kodre
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २८ जुलै रोजी भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने कांस्यपदकावर नाव कोरले.
मनू भाकरने महिला १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.
मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिलीच खेळाडू ठरली.
गेल्या पाच ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक कोणी कोणी जिंकून दिलंय यावर एक नजर टाकू.
साल २००८ मध्ये झालेल्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक नेमबाज अभिनव बिंद्राने जिंकलं होतं. त्याने सुवर्णपदक जिंकलं होतं.
साल २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक नेमबाद गगन नारंगने जिंकलं होतं. त्याने कांस्य पदक जिंकलं होतं.
रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारतासाठी पहिलं पदक कुस्तीपटू साक्षी मलिकने जिंकलं होतं. तिने कांस्य पदक जिंकलं होतं.
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतासाठी पहिलं पदक वेटलिफ्टर मिराबाई चानूने जिंकलं होतं. तिने रौप्य पदकाला गवसणी घातली होती.