Saisimran Ghashi
पोट साफ होत नाही,पोटात गॅस होतो आणि अपचन अश्या समस्या हल्ली खूप वाढल्या आहेत.
पोटाच्या या सर्व तक्रारींच्या साठी एक रामबाण उपाय आहे ते म्हणजे ओवा.
1 ग्लास पाणी उकळत ठेवा. त्यामध्ये अर्धा टीस्पून ओवा टाका आणि 5 मिनिट उकळून घ्या.
5 मिनिट उकळून ते मिश्रण थंड करा आणि त्यात चवीपुरते मीठ टाका.
मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात पाव तुकडा लिंबू पिळा आणि ते मिश्रण गाळून प्या.
हे पाणी रोज दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर सेवन करा.
या उपायाने अपचनाची समस्या दूर होऊन गॅस आणि पोट साफ न होण्याची तक्रार दूर होईल.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. पोटासंबंधित तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.