सकाळ डिजिटल टीम
बांबू लागवड ही शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असून, यातून पर्यावरण समतोल राखला जाऊन प्रदूषण कमी होणार आहे, तसेच लोकांना उत्पन्नही मिळणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
या योजनेसोबत शेततळ्याची योजनाही जोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल, तसेच लवकरच बांबूवर प्रक्रिया उद्योग उभारले जातील, अशी ग्वाही ही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
बांबू लागवड मिशन अंतर्गत बांबू लागवड व शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम दरे (ता. महाबळेश्वर) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत संस्थांचे सदस्य पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘दरे परिसरात १०५ गावे असून, भात आणि नाचणी हे येथील प्रमुख पिके आहेत. अनेकजण स्ट्रॉबेरीची लागवड करतात. आता बांबू लागवड करणार आहोत.
एमआरइजीएसमध्ये बांबूचा समावेश केला आहे. अडीच वर्षांत शेतकऱ्यांना साडेसात लाख रुपये मिळणार आहेत. लागवडीसाठी शासनाच्या माध्यमातून हेक्टरी तीन वर्षांत साडेसहा ते सात लाख रुपये दिले जात आहेत.
यामध्ये खड्ड्यापासून रोपांपर्यंत शासन मदत करते. यातून चांगले उत्पन्न मिळणार आहे. शासनाचीही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. पाशा पटेल यांनी बांबू लागवडीचा अभ्यास केलेला आहे. यातून पर्यावरण समतोल राखला जाऊन प्रदूषण कमी होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.