'लाईट'भोवती घिरट्या घालणाऱ्या किड्यांचा असा करा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

रात्रीच्या वेळी विद्युत दिव्यांभोवती घिरट्या घालणाऱ्या किड्यांचा सर्वांनाच वैताग येतो. ह्या किड्यांचा घरच्या घरी बंदोबस्त करता येतो. तोही अगदी सोप्या पद्धतीने.

गृहविज्ञान तज्ज्ञ डॉ. विद्या गुप्ता यांनी यावर उपाय सांगितला. लवंगीचं तेल, कापूर, कडूलिंबाचं तेल, लसूण, खाण्याचा सोडा आणि लिंबाचा वापर करावा

बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण किड्यांना पळवून लावण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. थोड्या पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळावा.

हे मिश्रण एका स्प्रे पंपामध्ये भरावं. त्यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा किडे दिव्यांभोवती घिरट्या घालतात तेव्हा किड्यांवर स्प्रे मारावा

लवंग प्रत्येकाच्या घरात असतेच. जर तुमच्याकडे लवंगीचं तेल नसेल तर ते तयार करुन त्याचा वापर करता येईल. तेलामध्ये पाणी मिसळून त्याचा स्प्रे केला तरी चालतो.

कापूर हा पूजेमध्ये वापरला जातो. कापराचा उग्र वास किड्यांना असह्य होते आणि ते पळून जाात. त्यामुळे कापूर पावडर आणि तेलाचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय कापूर जाळूनही किडे पळवून लावतात येतात

किड्यांना पळवून लावण्यासाठी लसणाचाही वापर करता येतो. सुरुवातीला लसणाची पेस्ट बनवावी. त्यानंतर थोड्या पाण्यात ही पेस्ट उळून घ्यावी.

हे मिश्रण थंड झाल्यानंतर स्प्रे पंपात टाकावं आणि त्याचा छिडकाव करावा. लसणाचा तिखटपणा किड्यांना घरापासून दूर ठेवण्यात मदत करतो.

रोपांचं नुकसान करणारे किडे किंवा लाईटच्या जवळ घिरट्या घालणारे किडे यांच्यापासून सुटका करण्यासाठी कडूलिंबाच्या तेलाचा चांगला उपयोग होऊ शकतो.

कडूलिंबाच्या तेलाचं द्रावण तयार करुन खिडक्या, दरवाजे आणि इतर जागांवर शिंपडावं त्यामुळे असे किडे घरामध्ये येण्यापासूनच थांबतील.