Aishwarya Musale
आपल्याला निरोगी, हेल्दी आयुष्य हवं असेल तर फक्त चांगला, पौष्टिक आहाराच नव्हे तर चांगली झोपही तितकीच गरजेची आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, प्रत्येकाने दररोज किमान 8 तास तरी झोप घेतलीच पाहिजे. झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर अस्वस्थ वाटतं. कोणतंही काम वेळेवर होत नाही.
नीट झोप घेतली नाही तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर विपरीत परिणाम होतो. यामुळे सिंपेथिक नर्व्हस ॲक्टिव्हिटी वाढते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.
आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयावरील प्रेशर वाढतं आणि रक्तवाहिन्या खराब होण्याचा धोकाही असतो. असे दीर्घकाळासाठी सुरू राहिले तर हृदयविकाराचा धोका वाढतो.
जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि खराब किंवा वाईट कोलेस्ट्रॉल वाढत राहतं.
झोप पूर्ण न झाल्याने मधुमेहाचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे ग्लूकोज मेटाबॉलिज्म प्रभावित होते, ज्याने ब्लड शुगर वाढू शकते.
मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार किंव हृदयाशी संबंधित आजार टाळण्यासाठी पुरेशी झोप घ्या.
टेक्नॉलॉजी गॅजेट्स, स्क्रीनपासून लांब राहा आणि झोपायचे वेळापत्रक बनवून ते नियमितपणे पाळा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.