रोहित कणसे
जय शाह यांनी अगदी कमी वयात मोठं यश संपादन केलं असून ते इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल म्हणजेच आयसीसीचे सर्वात कमी वयाचे चेअरमन बनले आहेत.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जय शाह यांच वय फक्त ३५ वर्ष असून आयसीसीचे बॉस बनताना त्यांचा वाटेला कोणीही आलं नाही. त्यांची निवड बिनविरोध झाळी आहे.
जय शाह जिल्हा स्तराहून सुरूवात करून आज जागतिक स्तरावर त्यांच्या कामामुळेच पोहचल्याचे सांगितले जाते.
जय शाह अचानक या पदावर पोहचले नाहीत यासाठी त्यांना १५ वर्ष काम करावे लागले आहे, त्यांनी २००९ पासूनते प्रशासकिय अधिकारी म्हणून क्रेकेट संबंधीत असोसिएशन, बोर्ड आणि कान्सिल्समध्ये काम करत आहेत.
जय शाह यांचा क्रिकेट प्रशासनात औपचारिक प्रवेश २००९ साली झाला, त्यावेळी ते फक्त 20 वर्षांचे होते.
त्यांनी जिल्हा स्तरावर केंद्रीय क्रिकेट बोर्ड अहमदाबाद सोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी म्हणून राज्यस्तरीय प्रशासनात रुजू झाले आणि पुढे ते त्याचे सहसचिव बनले.
जय शाह यांचे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीत मोलाचे योगदान आहे.
पुढील काही वर्षांमध्ये त्यांनी क्रिकेटसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे, २०१९ मध्ये ते सर्वात तरुण बीसीसीआय सचिव म्हणून निवडले गेले.
इतकेच नाही तर २०१९ मध्येच, जय शाह यांची आगामी काळातील ICC च्या मुख्य कार्यकारी समिती बैठकींसाठी BCCI चे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
पुढे BCCI मध्ये मोठे पद भूषवल्यानंतर आणि ICC मध्ये भारताचे प्रतिनिधी बनल्यानंतर, जय शाह यांची २०२१ मध्ये एशियन क्रिकेट कौन्सिल म्हणजेच ACC चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
२०२२ मध्ये ते आयसीसीच्या बोर्डाचे सदस्यही झाले. २०२४ च्या सुरूवातीला जय शाह यांची ACCC चेअरमनपदी पुन्हा निवड झाली.
माहिरा खानने शेअर केले पतीसोबतचे रोमँटिक फोटो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.