Sandip Kapde
विमान प्रवास करताना आपल्या अनेक प्रश्न पडतात. विमानाचा आकार, रंग खिडक्या याबाबत तुमच्या मनात देखील अनेक प्रश्न निर्माण झाले असतील.
विमानात प्रवास करण्यासाठी आपण तिकीट बुक करताना पहिले प्राधान्य विंडो सीटला देतो.
विंडो सीट मिळाली नाही तर आपण दुसरी सीट बुक करतो. कारण सीट कोणतीही असो आपले लक्ष विमानाच्या खिडकीकडे असते.
तुम्ही कधी हा विचार केला का? की विमानाच्या खिडक्या गोल का असतात?
गोल खिडकीमागे काय कारण आहे ते जाणून घेऊया.
विमानात वापरण्यात येणारी खिडकी पूर्णपणे गोलाकार नसते पण अंडाकृती आकारासारखी असते.
याचे कारण असे आहे की चौकोनी आकाराची खिडकी वाऱ्याचा दाब सहन करत नाही आणि ती क्रॅक होते.
तर गोल खिडकी वाऱ्याचा दाब सहन करते आणि तडा जात नाही कारण खिडकीच्या वक्रतेमुळे दाब वितरित केला जातो.
जेव्हा विमान आकाशात असते तेव्हा हवेचा दाब विमानाच्या आत आणि बाहेर असतो आणि हा दाब बदलत राहतो, म्हणूनच विमानात गोल खिडक्या बसवल्या जातात.
गोल खिडक्या असल्यामुळे विमानाची उंची आणि वेग जास्त असताना तुटण्याचा धोका कमी होतो.
विमानाच्या खिडक्या आधी गोलाकार नव्हत्या पूर्वी चौकोनी खिडक्याही होत्या. याआधी विमानाचा वेग कमी असल्याने ते जास्त उंचीवर उडत नव्हते आणि या सगळ्यामुळे जास्त इंधन लागत होते.
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने विमानांचा वेगही वाढवण्याची गरज भासू लागली.
त्यामुळे कंपन्यांनी विमानाचा वेग वाढवल्याने विमानांच्या खिडक्याही चौकोनी ते गोल असा बदलाव्या लागल्या जेणेकरून वेग वाढला की हवेचा दाब सहन करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.