Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील आराध्य दैवत आहेत, ज्यांनी जनतेस स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे महत्त्व शिकवले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासूनच त्यांच्या मनात शौर्य आणि धर्मरक्षणाची भावना रुजली होती. रामायण, महाभारत आणि महाराणा प्रताप यांसारख्या शूरवीरांच्या गाथांनी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांवरील अत्याचारांना कठोर शिक्षा होती.
महाराजांची गुप्तचर यंत्रणा भारतातील सर्वात प्रभावी यंत्रणांपैकी एक होती. बहिरजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही यंत्रणा शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवून असायची.
शाहिस्ते खानवर केलेला हल्ला शिवाजी महाराजांच्या धाडस आणि युद्धकौशल्याचे उत्तम उदाहरण आहे.
महाराजांनी १६७७ मध्ये कुतुबशाही शासक अबुल हसन तानाशाह यांच्याशी लष्करी युती करण्यासाठी गोलकोंडा किल्ल्याला भेट दिली होती हे अनेकांना माहीत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण भारतातही आपले साम्राज्य पसरवले आणि तंजावरपर्यंत आपले राज्य विस्तारले.
महाराजांनी शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी गनिमी कावा या युद्धनीतीचा उपयोग केला.