धनश्री भावसार-बगाडे
एकेकाळी भारताचे साम्राज्य अफगाणीस्तापर्यंत पसरलेलं होतं. बांग्लादेश, म्यानमान, काबुल, पेशावरपर्यंत अखंड भारत होता. राजा चंद्रगुप्त मौर्य यांना अफगाणीस्तान-पाकिस्तानचा भाग हुंड्यात मिळाला होता.
ही कहाणी इ.स. पूर्व ३२६ च्या काळातली आहे. यूनानवरून सिकंदरचे आक्रमण झाले होते. सिकंदरने व्यास नदी पार केली नव्हती.
पण सिकंदरचा सैन्यप्रमुख सेल्युकस निकेटर परत आला आणि त्याने व्यास नदी पार केली. तेव्हा मगधवर चंद्रगुप्त मौर्य यांचे शासन होते.
चंद्रगुप्तचे प्रधानमंत्री चाणक्य होते. त्यांनी सिकंदरला परतण्यास भाग पाडलं.
चंद्रगुप्तकडे हत्तींची फौज होती. सेल्युकसला हे माहित झालं तर त्याने लढण्यासाठी हत्ती आणले.
चाणक्याच्या सांगण्यावरून चंद्रगुप्तने हत्तींच्या समोर घोड्यांचे सैन्य आणले. पावसाळ्याची वाट पाहिली. युद्ध त्या दिशेला केले जिथे पाणी भरत होते.
हत्ती पाण्यात पडू लागले आणि घोडे त्यांच्यावर हावी ठरले. सिकंदर रथ घेऊन लढण्यास आला होता. तर चंद्रगुप्त मौर्याच्या सैन्यात मोकळे घोडे होते.
सेल्युकस फसला होता. सांगितले जाते की, अजून १-२ दिवस युद्ध चालले असते तर तो मारला गेला असता. त्याने मुलगी हेलनचे लग्न चंद्रगुप्त मौर्यशी लावण्याचे ठरवले.
जाता जाता सेल्युकसला आपल्या मुलीच्या सुरक्षेचा धोका वाटू लागला. म्हणून त्याने चंद्रगुप्तला हुंडा दिला.
सेल्युकसने एरिया (हेरात), अराकोसिया (कंधार), जेड्रोसिया (मकरान/बलूचिस्तान), पेरोपेनिसडाई (काबुल) हा भाग हुंड्यात दिला.
अशा प्रकारे बघितलं तर पूर्ण पाकिस्तान आणि अफगाणीस्तान चंद्रगुप्त मौर्यला हुंड्यात मिळालं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.