Sudesh
आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात शेवटचा ग्रह नेपच्यून आहे. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात, तर नेपच्यूनला यासाठी तब्बल 165 वर्षांचा कालावधी लागतो.
अंतराळात काही असे ग्रह देखील आहेत, जे कोणत्याच ताऱ्याभोवती फिरत नाहीत. अशा प्रकारचे सुमारे 20 हजार कोटी ग्रह अंतराळात फिरत आहेत.
सूर्याचं वजन हे प्रत्येक सेकंदाला एक कोटी किलोंनी कमी होत आहे. याला कारण म्हणजे, सूर्य मोठ्या प्रमाणात उर्जा आणि कण उत्सर्जित करत असतो.
आपल्या सूर्यमालेत सूर्य हा एकुलता एक तारा आहे. मात्र कित्येक सूर्यमालांमध्ये दोन किंवा तीन सूर्यही आहेत. काही ठिकाणी तर शेजारी-शेजारीच जुळे किंवा तिळे तारेही आहेत.
अंतराळात बऱ्याच ठिकाणी पाणी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गुरू ग्रहाच्या युरोपा, गानिमेडे आणि कॅलिस्टो या चंद्रांवर; तसंच शनीच्या दोन चंद्रांवर देखील पाणी असल्याचं म्हटलं जात आहे.
अंतराळातील प्रयोगशाळा असणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गुरूत्वाकर्षण नसल्याचं वाटतं. मात्र या ठिकाणी ग्रॅव्हिटी आहे. अर्थात ही ग्रॅव्हिटी पृथ्वीच्या तुलनेत 10-11 टक्क्यांनी कमी आहे.
पृथ्वीवरील दिवस हा काळानुसार मोठा होत चालला आहे. याला कारण म्हणजे, पृथ्वीची फिरण्याची गती ही कमी होत आहे.
शुक्र हा आपल्या सूर्यमालेतील एकमेव असा ग्रह आहे जो उलट्या दिशेने फिरतो. यामागचं कारण अद्यापही शास्त्रज्ञांना समजलेलं नाही.
चंद्राचा आकार हा आपल्याला गोल दिसतो. मात्र, चंद्र हा थोडासा अंडाकृती आहे. तो पृथ्वीपासून दूर असल्यामुळे आपल्याला गोल दिसतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.