आशुतोष मसगौंडे
भारतीय पौराणिक कथेनुसार, घरात काळी मांजर ठेवणे अशुभ मानले जाते. काळ्या मांजरीला अशुभ आणि वाईट प्राणी म्हटले जाते.
घरी एक मांजर पाळले तर ते कुटुंबातिल लोकांची हृदयविकाराची शक्यता कमी करू शकते.
सर्वसाधारणपणे मांजर पाळल्याने घराची भरभराट होते असे मानले जाते.
तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी घरात मांजर पाळल्याने फायदा होतो असे म्हटले जाते. .
मांजरीच्या आकर्षक आणि खेळकर वृत्तीमुळे घरातील लोक आनंदी राहतात.
मांजरी त्यांचे प्रेम अनेक प्रकारे दाखवतात आणि त्यांचे बिनशर्त प्रेम हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अद्वितीय आणि विशेष पैलू आहे.
नैसर्गिक शिकार प्रवृत्ती असल्यामुळे मांजरी पाळल्याने घरातील कीटक-किड्यांवर सोप्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मांजरीचा देखभाल खर्च कमी असल्याने ती पाळणे कमी कटकटीचे असते.