आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त जाणून घ्या डान्स करण्याचे फायदे

Monika Lonkar –Kumbhar

आंतरराष्ट्रीय नृत्य दिन

आज जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

दरवर्षी २९ एप्रिलला हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. नृत्य केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. नृत्य दिनानिमित्त आज आपण हे फायदे जाणून घेणार आहोत.

फॅट्स कमी होतात

जर तुम्ही नियमितपणे डान्सचा सराव केला तर तुमच्या शरीरावर जमा झालेले फॅट्स वेगाने कमी होतात.

वजन कमी होते

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठीचे इतर उपाय करून दमला असाल तर हा डान्सचा उपाय नक्की करा. डान्स केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

ताण-तणाव कमी होतो

नियमितपणे डान्सचा सराव केल्याने ताण-तणाव कमी होतो आणि मूड फ्रेश होतो.

थकवा दूर होतो

नृत्यामुळे तुम्हाला उत्साही वाटते आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

रक्ताभिसरण सुधारते

डान्सचा सराव केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

कलर केलेल्या केसांवर या गोष्टींचा वापर करणे टाळा, केस होऊ शकतात खराब

Hair Care Tips | esakal
येथे क्लिक करा.