साक्षी राऊत
मैत्री हे आयुष्यातील महत्वपूर्ण नातं. लहानपणापासून आपण मित्रांच्या मदतीने आयुष्याच्या वाटेवर पुढे वाटचाल करत असतो. हा दिवस आणखी खास करण्यासाठी ३० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो.
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली (U.N.) द्वारे आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस नियुक्त केला गेला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लोक एकमेकांशी कनेक्ट होऊन मैत्री वाढवू शकतात. जगभरातील लोकांच मैत्रीचं अनोखं नातं जपण्यासाठी हा दिवस ३० जुलैला जगभरात साजरा केला जातो.
तेव्हा यंदा मैत्री दिवसाला तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना फ्रेंडशिप बँड गिफ्ट करून तुमच्या नात्यातला गोडवा आणखी वाढवू शकता.
मार्केटमध्ये फ्रेंडशिप डे च्या आठवड्याभरापूर्वी तरूणांची फ्रेंडशिप बँड्स विकत घेण्यासाठी गर्दी असते.
कोणी फ्रेंडशिप डेला जवळच्या मित्र/मैत्रिणीस ब्रॅसलेट देऊन हा दिवस साजरा करतात, तर कोणाला फ्रेंडशिप बँड गिफ्ट करायला आवडतं.
मार्केटमध्ये तुम्हाला बँड्स, ब्रॅसलेट, बँगल अशा वेगवेगळ्या स्वरूपात फ्रेंडशिप डे साठीच्या खास वस्तू दिसतील. तुम्हाला आवडेल ते तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणीस गिफ्ट करू शकता.
तुमच्या मित्र मैत्रिणींना तुम्ही वूलन बँड्ससुद्धा गिफ्ट करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.