चाय की एक चुस्की अन्; बॉलीवूडचे चहा प्रेमी

Aishwarya Musale

सकाळी उठल्यावर हवी हवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे चहा. जवळपास ९० टक्के लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात चहा पिऊन करतात.

आज टी डे च्या निमित्ताने चहाचे शौकीन असणारे बॉलीवूड कलाकार कोणते ते आपण जाणून घेणार आहोत.

हल्ली टी लव्हर सोशल मीडियावर त्यांचं चहावरचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. अगदी त्याप्रमाणेच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटीज हे टी लव्हर आहेत. चहाशिवाय त्यांचा दिवस सुरूच होत नाही.

सोनम कपूर

सोनम कपूर ही चहाप्रेमी असून ती चहावर वेगवेगळे एक्सपिरीमेंट्सही करत असते.

मलायका अरोरा

मलायकाच्या स्लीम आणि फिट बॉडीची चर्चा सर्वत्र आहे. मलायका फिट राहाण्यासाठी स्ट्रीक्ट डाएट फॉलो करते. मात्र चहाबाबत तिचा एक्सक्यूज नसतो. चहाला ती कधी नाही म्हणत नाही. तिच्या दैनंदिन आहारात चहाचा समावेश करते.

आलिया भट

चहाचे व्यसन आलियालासुद्धा आहे. कलंक चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वरूण धवनने तिच्या या व्यसनाबाबतचे सीक्रेट उघड केले होते. आलियाला फक्त ग्रीन टीच नाही तर सर्व प्रकारचा चहा आवडतो.

यामी गौतम

यामी ही चहाप्रेमी असल्याचे तिने स्वत:च कबूल केले आहे. यामीला आवडत्या गोष्टी करताना किंवा पुस्तक वाचताना चहा प्यायला फार आवडतं.

यामीला कुठलाही विचार करत असताना तिला चहा हा लागतोच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.