सकाळ डिजिटल टीम
दक्षिण भारतात असलेल्या नागरहोल व्याघ्र प्रकल्पात वाघांचे सर्वाधिक प्रमाण आहे. वाघांसह अन्य प्राणी-पक्षी पाहण्यासाठी जंगल सफरकरिता हे एक उत्तम ठिकाण आहे.
पेंच राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. मध्य प्रदेशातील सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यात हे उद्यान आहे. तीन व्याघ्र प्रकल्पांपैकी एक म्हणजे पेंच. येथे दिवसा तसंच रात्रीच्या वेळेस जंगलसफारी करून वाघाचे दर्शन घेतले जाऊ शकते.
काझीरंगा हे दुर्मिळ अशा एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे, पण येथे व्याघ्र प्रकल्पही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येथील वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात जुने पार्क आहे. येथे व्याघ्र संवर्धनासाठी अनेक उपाययोजना आखल्या जातात.
सातपुडा व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात जुन्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पास नक्की भेट द्या.
वाघांचे दर्शन घेण्यासाठी आपण उत्तर प्रदेशातील पीलीभीत व्याघ्र प्रकल्पास भेट देऊ शकता.
महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र दर्शनाकरिता प्रसिद्ध आहे. येथील स्थानिक वाघाची देव म्हणून पूजा करतात.
बांधवगड राष्ट्रीय उद्यानात रॉयल बंगाल टायगर्सची संख्या सर्वाधिक आहे. येथे पांढऱ्या वाघांचंही दर्शन घडतं असे म्हटलं जाते.
वाघांची सर्वाधिक संख्या असणारे उद्यान म्हणून रणथंबोर राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. या उद्यानास नागरिक मोठ्या संख्येनं भेट देत असतात.
मध्य प्रदेशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ‘कान्हा’ येथे ‘लँड ऑफ द टायगर’ या फिल्मचेही चित्रिकरण करण्यात आले होते. या पार्कलाही आपण भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.