Monika Lonkar –Kumbhar
जगभरात दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
महिला दिनानिमित्त अनेक महिला एकत्र येऊन विविध प्लॅन्स बनवतात. कुणी एकत्र फिरायला जातात तर कुणी सोलो ट्रॅव्हलिंगचा पर्याय निवडतात.
आज आम्ही महिला दिनानिमित्त तुम्हाला महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोत्तम असणाऱ्या काही देशांबद्दल सांगणार आहोत. जिथे महिला बिनधास्तपणे फिरू शकतात. कोणते आहेत ते देश? चला जाणून घेऊयात.
गुन्हेगारीचा सर्वात कमी दर, शांत वातावरण आणि सार्वजनिक सेवा यामुळे, एकट्या महिला प्रवाशांसाठी स्वित्झर्लंड हा अतिशय उत्तम देश आहे. अल्पाइन लँडस्केप, सुंदर बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर तलाव यासाठी हा देश प्रसिद्ध आहे
बर्फ आणि अग्निची भूमी म्हणून या देशाला खास करून ओळखले जाते. कारण, या ठिकाणी अनेक सुंदर हिमनद्या आणि ज्वालामुखी पहायला मिळतात. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास हा देश सोलो ट्रॅव्हलिंग करण्यासाठी महिलांसाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे.
भूतान हा अतिशय शांतता प्रिय देश मानला जातो. या देशात तुम्ही बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर मठांना भेट देऊ शकता. हा देश पर्वतांनी वेढलेला असल्याने येथे अनेक सुंदर नजारे तुम्हाला पहायला मिळतात.
फिनलॅंड हा देश महिलांच्या सोलो ट्रॅव्हलिंगसाठी अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे, महिला येथे बिनधास्तपणे प्रवास करायला येऊ शकतात. या देशात आल्यानंतर, सांताक्लॉज व्हिलेजपासून ते नॉर्दर्न लाइट्स पाहण्यापर्यंत अनेक रोमांचक अनुभव तुम्हाला घेता येतील.
जागतिक शांतता निर्देशांकात सातवे स्थान मिळविणारा हा देश महिलांसाठी अतिशय सुरक्षित मानला जातो. या देशात आल्यावर तुम्ही येथील सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेऊ शकता.