Monika Lonkar –Kumbhar
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या उत्तम अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखली जाते.
आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने अमृताने तिचे योगा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री अमृता खानविलकर अगदी न चुकता रोज योगा करून फिट राहते.
शूट आणि व्यायाम यांचा योग्य समतोल साधत अमृता रोज योगा करते आणि फिट राहते.
यंदाच्या योगा निमित्ताने अमृताने तिच्या व्हिडिओ मधून खास संदेश दिला आहे. अमृता म्हणते 'योगा करणंं, हा माझ्या जगण्याचा एक भाग झाला आहे.
अमृता म्हणते की, शूट मधून कायम वेळ काढून मी योगा करतेय. जेव्हा आपण योगा करतो तेव्हा ब्रिदिंग हे नीट जमलं पाहिजे.
तुम्हाला आसन नाही आली तरी चालेल पण तुम्हाला व्यवस्थित ब्रिदिंग जमलं पाहिजे, असे अमृता म्हणते.