Arjun Tendulkar: पहिलीच मॅच, तीन वर्षांनी संधी!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी एक मोठी गोष्ट घडल्याचे दिसून आले आहे.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.

या सामन्यात रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे.

रोहित शर्माच्या पोटात दुखत आहे. मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये ड्वेन जॉन्सनचा समावेश करण्यात आला आहे.

इम्पॅक्ट प्लेअरमध्ये अर्जुन तेंडुलकरचेही नाव आहे, तो या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणार आहे.

अर्जुनचा यंदाच्या लिलावात मुंबई संघाने 30 लाख रुपयांना आपल्या संघात समावेश केला होता.

IPL 2018 च्या मेगा लिलावात मुंबई संघाने प्रथम अर्जुनचा आपल्या संघात समावेश केला होता, परंतु आजपर्यंत या खेळाडूला एकही IPL सामना खेळता आलेला नाही.

अर्जुन तेंडुलकर तीन वर्षे मुंबई इंडियन्सच्या शिबिरात सहभागी होत होता. त्याला सतत बेंचवर बसावे लागत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar