रोहित कणसे
इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या सीजनची धमाकेदार सुरूवात झाली आहे, या स्पर्धेत प्रत्येक मॅचसोबत नवे रेकॉर्ड बनत आहेत.
यादरम्यान आज आपण आयपीएलच्या इतिहासात सर्वाधित शतक ठोकणारे प्लेअर्स कोणते ते पाहाणार आहोत.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतक ठोकण्याचं रेकॉर्ड वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रीस गेलच्या नावावर आहे.
गेलने आयपीएलमध्ये आतापर्यंतर ६ शतक ठोकले आहेत.या स्पर्धेत त्याने तब्बल १४२ सामने खेळले आहेत.
वेस्टइंडीजचा हा स्फोटक फलंदाज आयपीयलचा बादशाहा मानला जायचा.
गेलने आयपीएलमध्ये एकूण ४९६५ धावा केल्या आहेत, त्याच्या नावावर ३१ अर्धशतकं देखील केली आहेत.
गेलनंतर दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे, त्याने २१६ सामन्यांमध्ये एकूण ५ शतकर झळकावले आहेत.
इतकेच नाही तर आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार देखील गेलने मारले आहेत.
गेलने त्याच्या आयपीएल करियरमध्ये एकूण ३५७ छक्के लगावले आहेत.
तर दुसऱ्या स्थानावर एबी डिविलियर्स दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने २५१ छक्के लगावले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.