सकाळ डिजिटल टीम
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेपूर्वी दहापैकी तीन संघांनी कर्णधार बदलले आहेत, तर सात संघांचे कर्णधार कायम आहेत. सर्व संघांच्या कर्णधारांवर एक नजर टाकू
चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद एमएस धोनीकडे आहे. तो 2008 पासून या संघाचे नेतृत्व करत आहे.
मुंबई इंडियन्सने यंदा नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. यंदा हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद फाफ डू प्लेसिस सांभाळेल. तो 2022 पासून या संघाचा कर्णधार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर सांभाळणार आहे.
पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. तो 2022 पासून या संघाचा कर्णधार आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच असणार आहे. तो 2021 पासून या संघाचे नेतृत्व करत आहे.
सनरायझर्स हैदराबादने यंदा पॅट कमिन्सकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये नेतृत्व करणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघात ऋषभ पंतने अपघातानंतर पूर्ण तंदुरुस्त होऊन पुनरागमन झाले असून तो आयपीएल 2024 मध्ये नेतृत्वही करणार आहे.
लखनई सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व केएल राहुलकडेच कायम ठेवण्यात आले आहे.
हार्दिक मुंबई संघात गेल्याने गुजरात टायटन्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. यंदा शुभमन गिल गुजरातचे नेतृत्व करणार आहे.
PSL 2024: इस्लामाबाद युनायडेट तिसऱ्यांदा चॅम्पियन