अनिरुद्ध संकपाळ
टी 20 क्रिकेटमध्ये पहिल्या सहा षटकांसोबतच शेवटच्या पाच षटकात तुम्ही कशी फलंदाजी करता यावर सर्व काही अवलंबून असतं.
शेवटच्या पाच षटकात यंदाच्या हंगामात बऱ्याच खेळाडूंना 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या आहे.
यंदाच्या हंगामात आतापर्यंत शेवटच्या पाच षटकात सर्वात चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करण्यात दिल्ली कॅपिटल्सचा ट्रिस्टन स्टब्स आघाडीवर आहे. त्याने 263 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
यानंतर या यादीत दुसरे नाव सनराईजर्स हैदराबादच्या हेन्रिच क्लासेनचे आहे. त्याने 230 च्या स्ट्राईक रेटने स्लॉग ओव्हरमध्ये धुमाकूळ घातला.
तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्जचा शशांक सिंहचे नाव येते. त्याने 227 च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकल्या.
चौथ्या स्थानावर एमएस धोनी असून त्याने यंदाच्या हंगामात शेवटच्या काही षटकातच फलंदाजी केली. त्याने या धावा 227 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत.
या यादीत पाचव्या स्थानावर दिनेश कार्तिक आहे. आरसीबीच्या या मॅच फिनिशरने 226 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या.