IPL 2024 Auction : हार्दिकमुळं मुंबई इंडियन्सची लिलावात कंजूसी?

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 लिलावापूर्वीच हार्दिकच्या ट्रेडवर जुगाड करून वारेमाप पैसा खर्च केला होता. त्यामुळे यंदाच्या लिलावात त्यांना कंजूसी करावी लागली.

मुंबई इंडियन्सने यंदाच्या लिलावात आठ खेळाडू खरेदी केले आहेत. त्यातील 4 खेळाडूच एक कोटीच्या वर गेले. विशेष म्हणजे मुंबईने एकाही खेळाडूला 10 कोटीच्या वर बोली लावली नाही.

मुंबईने यंदाच्या लिलावात गेराल्ड कोएट्जीवर सर्वाधिक बोली लावली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या या अष्टपैलू खेळाडूला 5 कोटी रूपये खर्चून आपल्या गोटात घेतलं.

त्यानंतर मुंबईने श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाला 4.6 कोटी रूपयात खरेदी केलं. तर नुवान तुषाराला 4.80 कोटी देऊन आपल्याकडे खेचलं.

मुंबईने मोहम्मद नबीला देखील 1.50 कोटी रूपयात खरेदी केलं. ही मुंबईची कोट्यावधीची शेवटची खरेदी होती.

मुंबईने यानंतर श्रेयस गोपाल (20 लाख), शिवालिक शर्मा (20 लाख), अंशुल कंबोज (20 लाख), नमन धीर (20 लाख) या सर्वांना बेस प्राईसलाच खरेदी केलं.

टीम इंडियाला नडलेला कमिन्स बनला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pat cummins most expensive player of ipl history Sold for 20.5 crore to SRH IPL 2024 Auction
येथे क्लिक करा